आदित्य ठाकरेंना लहान पनापासून खोक्यांशी खेळण्याची सवय : केसरकर

0

मुंबई : उद्धव ठाकरे आमच्यावर खोके घेतल्याचे आरोप करतात. मात्र, आदित्य ठाकरे यांनाच लहानपणापासून खोक्यांशी खेळण्याची सवय आहे, अशी घणाघाती टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेड येथे सभा होत आहे. त्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कोकणी माणसाकडे दुर्लक्ष केले. आता सहानुभूती मिळवण्यासाठी खेडमध्ये सभा घेऊन त्यांनी आमच्यावर वाट्टेल ते आरोप केले. मात्र, मी कुणाबद्दल वाईट बोलणार नाही. तरीही कोकणातील जनतेने वस्तुस्थितीची खात्री केलीच पाहीजे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेले. कोकणी माणसाने शिवसेनेला प्रचंड प्रेम दिले. मात्र, त्याबदल्यात उद्धव ठाकरेंनी कोकणाला काहीही दिले नाही. सिंधूरत्न योजनेसाठी उद्धव ठाकरेंनी केवळ 25 कोटींची तरतूद करुन जखमेवर मीठ चोळले.

दीपक केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोकणासाठी आतापर्यंत मोठे निर्णय घेतले आहेत. कोकणाला भरभरून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उलट उद्धव ठाकरेंनीच कोकणातून त्यांना एवढे लोकं का सोडून गेले, याकडे लक्ष दिले पाहीजे. आम्ही कोकणासाठी अनेक चांगले निर्णय घेत आहोत. त्याला उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद दिले पाहीजे. उलट तेच आमच्यावर खोक्याचे आरोप करताय. मात्र, आदित्य ठाकरेच लहानपणापासून खोक्यांशी खेळत आहोत.

राज्यात जुन्या पेन्शनसाठी सध्या शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यात शिक्षकही सहभागी झाले आहेत. त्यावर दीपक केसरकर म्हणाले, राज्यातील शिक्षकांसाठी महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढे काम झाले नाही, तेवढे मी केले आहे. कोरोनामुळे गेल्या काही काळापासून शिक्षक भरती झालेली नव्हती. मात्र, फेब्रुवारी ते मार्च 2023 मध्ये टेट परीक्षा आयोजित करण्यात आली असून याद्वारे राज्य शासन जवळपास 30 हजार शिक्षक भरती करणार आहे. शिक्षकांचा पदभरतीसाठी टेट परीक्षा एका वर्षात दोन वेळा घेतली जाणर आहे. सध्या 30 हजारपैकी 80 टक्के पदे भरण्याची परवानगी आम्हाला मिळाली आहे. उर्वरित पदेही त्यानंतर भरली जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.