शीतल महाजन यांचा नवा विक्रम

0

हरियाणा : हरियाणामधील पिंजर विमानतळावर एरो क्लब ऑफ इंडिया आयोजित नॅशनल मॉडलिंग फेलोशिप कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी पुण्याच्या पद्मश्री शितल महाजन यांनी ‘पॉवर हँग गलाइडर’मधून स्काय डायव्हिंग करून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष बाब म्हणजे, त्यांनी 5 हजार उंचावरून उडी घेत हा विक्रम नोंदवला. यावेळी ‘पॉवर हँग ग्लाईडर’चे सारथ्य उत्तर प्रदेशचे गोंडा जिल्ह्याचे विद्यमान खासदार आणि पायलट कीर्तीवर्धन सिंग यांनी केले.

‘पावर हँग्लायडर’मध्ये बसून स्काय डायवर शितल महाजन आणि पायलट खासदार कीर्तीवर्धन सिंग हे जमिनीपासून आकाशात पाच हजार फुटावरती गेले आणि पाच हजार फुटावरून शितलने फ्री फॉल जम्पिंग करत स्काय डायव्हिंग केले आहे. अशाप्रकारे पावर हँग ग्लायडर मधून स्काय डायव्हिंग करणारी शितल ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.

पायलट कीर्तीवर्धन सिंग हे पहिले भारतीय खासदार ठरले ज्यांनी अशा प्रकारची पॅराशुटची उडी पावर हँग्लाइडिंग मधून यशस्वीरीत्या पार पाडली. भारतात सध्या दोनच विद्यमान खासदार हवाई पायलट आहेत. त्यातील एक राजीव प्रताप रुडी सारण (बिहार) आणि दुसरे कीर्तीवर्धन सिंग (गोंडा, उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे.

खासदार कीर्तीवर्धन सिंग हे भारतातील पहिले खासदार आहेत जे ‘पावर हँग गलाइडर’चे पायलट आहेत. खासदार राजीव प्रताप रुडी हे इंडिगो या विमानाचे कमर्शियल पायलट आहेत आणि विद्यमान खासदारही आहेत.

या कामगिरी नंतर शीतल महाजन यांनी सांगितले की, ‘पॉवर हँग ग्लाईडर’मधून ‘स्काय डायव्हिंग’ करणे माझ्यासाठी नवीनच प्रकार होता. यामध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करू शकले याचा मला आनंद आहे. माझ्या सोबत विद्यमान खासदार कीर्तीवर्धन सिंग हे पायलट होते. त्यांनी प्रोत्साहित करण्यासोबतच मला या मोहिमेत यशस्वी साथ दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.