तेरचे जावई; भावी मुख्यमंत्री, सासुरवाडीत झळकले फलक

0

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सासूरवाडीत भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकले आहेत. यामुळे पुन्हा चर्चांना उधान आले आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असे बॅनर नागपुरात झळकले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सासूरवाडीत भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकले आहेत. यामुळे पुन्हा चर्चांना उधान आले आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असे बॅनर नागपुरात झळकले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील ‘तेर’ गाव ही अजित पवार यांची सासुरवाडी आहे. तिथे अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा आशयाचे पोस्टर झळकले आहेत. तेर गावातील चौकाचौकात ‘तेरचे जावई ,आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार’, असे पोस्टर दिसू लागले आहेत. अजित पवार ज्या गावचे जावई आहेत, तिथल्या भाबड्या जनतेनेही ही मागणी उचलून धरली आहे. गावातील लोकांनी जावयाची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी काकांनाच साकडे घातले आहे. आता काका म्हणजे राजकारणातले काका नव्हे तर संत गोरोबा काका. गावकऱ्यांनी संत गोरोबा काकांची विधिवत पूजा करून त्यांना साकडे घातले आहे.

राज्यात राजकीय भूकंप होणार अशा चर्चा गेल्या आठवड्यात रंगल्या होत्या. अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेनंतर त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत सर्व अफवा असल्याचे सांगितले होते. तसेच जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीबरोबर राहणार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे असे म्हटले होते. तर अजित पवारांनी देखील 2024 ला नाही तर मुख्यमंत्री पदावर आताच दावा सांगतो असे म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.