माझ्या विरोधातील षढयंत्र उघड करणार : मोहित कुंबोज

0

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये बेधुंद अवस्थेत मुलींबरोबर नाचत होते, याचा तपास करावा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मोहित कंबोज यांच्यावर सर्व बाजूंनी होत असेल्या टीकेवर त्यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.

माझ्याविरुद्धचे षडयंत्र लवकरच सत्यासह उघड करणार, असा दावा करत मोहित कंबोज यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. डुकरांशी कधीही कुस्ती करू नका, असा टोलाही त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे. मात्र कंबोज यांच्याविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आज संभाजी ब्रिग्रेड मोहित कंबोज यांच्याविरोधात आंदोलन करणार आहे.

संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा व्हिडिओ टविट केला आहे. यात सचिन कांबळे म्हणताय की, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज हे रात्री साडेतीन वाजता लिंक रोड खार पश्चिम येथील रेडिओ बार येथे मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांनंतर वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोहित कंबोज यांनी काल ट्विट करत लवकरच पलटवार करणार असल्याचे सांगितले आहे. मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हटले आहे की, प्रत्येक गोष्टीला उत्तराची गरज नसते. डुकरांशी कधीही कुस्ती करू नका, तुम्ही दोघेही गलिच्छ व्हाल आणि डुक्कराला ते आवडेल. मी माझे उत्तर योग्य वेळी आणि माझ्या शैलीत देईन. बनावट कथा आणि अफवा टिकणार नाहीत. यामागे काय षडयंत्र रचले गेले आहे ते लवकरच सत्यासह उघड होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.