पृथ्वीराज चव्हाण यांची कॅटगिरी काय हे त्यांनीच चेक करावे : शरद पवार

0

मुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागत असतात. यावर आज पत्रकार परिषदेत शरद पवारांनी त्यांना चांगलेत प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाणांचे त्यांच्या पक्षात काय स्थान आहे. ते A आहेत की B पहिल्यांदा चेक करावे. यात त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना जर विचारले तर त्यांची कॅटेगिरी काय तर ते जाहीरपणे नाही, पण खासगीत त्यांची कॅटेगिरी काय हे सांगू शकतील, असा खोचक टोला शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला आहे.

शरद पवार म्हणाले की, कर्नाटकात आम्ही जे उमेदवार दिले त्यात आम्ही सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकात विस्तारित पाऊल टाकण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. काँग्रेस किंवा मित्रपक्षासोबत आम्ही कर्नाटकात बोललो नाही. कारण आम्हाला शुन्यपासून सुरूवात करायची होती, म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी लोक पाहणी करण्यासाठी कुणीच पोहचले नाही, तर काही ठिकाणी पंचनामे झाले असले तरी शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. पक्ष सोडून शेतकऱ्यांना मदत करायला हवी असेही शरद पवारांनी म्हटले आहे. या सरकारची लोकांना मदत करण्याची भूमिका नाही, जनतेसमोर जाण्याची भूमिका सरकारची नाही, असेही पवारांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात कुणीही यावे, महाराष्ट्र कुणाला रोखत नाही. भाजपचे केंद्रीय मंत्री राज्यात येत आहे. पण केंद सरकारच्या मंत्र्यांनी राज्यातील प्रश्नावर चर्चा करायला हवी, समस्या सोडवायला हव्यात असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.