कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान सुरू

0

कर्नाटक : कर्नाटकमध्ये महिनाभराच्या निवडणूक प्रचारानंतर आज सकाळी 7 वाजल्यापासून 224 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. राज्यात 5.31 कोटी मतदार आणि 2615 उमेदवार आहेत. भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातच लढत आहे. 13 मे रोजी निकाल लागणार आहे.

यावेळी भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाच्या बड्या नेत्यांनी 450 हून अधिक सभा घेतल्या. तसेच 100 हून अधिक रोड शो केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस कर्नाटकात राहिले. तर राहुल, प्रियांका आणि सोनिया यांनी 31 हून अधिक सभा घेतल्या.

निवडणूक प्रचारात काँग्रेसने भाजप सरकारच्या भ्रष्टाचार आणि कमिशनवर लक्ष केंद्रित केले. तर भाजपने बजरंगबली, बजरंग दल, दहशतवाद हा मुद्दा बनवला. मोदींनी 19 पैकी 12 सभांमध्ये बजरंगबलीचा उल्लेख केला.

सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटी आणि राजकारणीही मतदानासाठी येऊ लागले आहेत. अभिनेता प्रकाश राज यांनी शांतीनगर येथील सेंट जोसेफ इंडियन स्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान केले. त्याचवेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बंगळुरूच्या विजयनगर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. येडियुरप्पा यांनी मतदान करण्यापूर्वी शिकारीपुरा येथील हुच्चराया स्वामी मंदिर आणि राघवेंद्र स्वामी मठात दर्शन घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.