महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : उद्या होणार सुनावणी

0

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. गुरुवारी शिवसेनेचे भवितव्य काय असेल हे स्पष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १६ आमदारांच्या अपात्रेचा निकाल सुद्धा उद्या लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाचा निकाल हा फक्त महाराष्ट्रासाठी नसून संपूर्ण देशावर याचा प्रभाव पडणार आहे.

 

बुधवारी दुसऱ्या एका केस च्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उद्याच्या कामकाजाचा संदर्भ देत म्हटले आहे की, न्यायालयाला उद्या दोन महत्वाच्या घटनापीठाचे निकाल आम्ही देणार आहोत. उद्या एका माजी न्यायाधीशांसाठी शोक सभा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी गुरुवारी १० ते ११ वाजेपर्यंत निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.