‘तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच दिसती का?’

0

पुणे : मी महाराष्ट्राची संस्कृती जपत आहे. मागच्या गोष्टी होत्या त्या सोडून मी पुढे निघाली आहे. मात्र तुम्हाला गौतमी पाटीलच दिसते का? मी काय महाराष्ट्राचा बिहार केला? याचे उत्तर द्या. मी कुठे चुकले ते सांगा , असे म्हणत प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलने छोटा पुढारी घनश्याम दरोडेसह टीकाकारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. फेमस होण्यासाठी तिला चुकीच्या वळणावर नेऊ नका. गौतमीताई महाराष्ट्राचा बिहार करु नका, असे आवाहन छोटा पुढारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दराडे याने गौतमी पाटीलला केले होते. त्यावर आता गौतमीनेही छोट्या पुढारीला प्रत्युत्तर दिले आहे.

गौतमी पाटील म्हणाली, कोण काय बोलले माहित नाही. मी व्हिडिओ पाहिलेला नाही. मी महाराष्ट्राची संस्कृती जपत आहे. ज्याकाही मागच्या गोष्टी होत्या त्या सोडून मी पुढे निघाली आहे. माझ्यात झालेल्या सुधारणा तुम्हाला दिसत असतील. मी काय म्हणते तुम्हाला गौतमी पाटीलच दिसते का? मी काय महाराष्ट्राचा बिहार केला. कुठे महाराष्ट्राचा बिहार केला. अजून आहेत इतरही अनेक आहेत त्यांच्याकडे पाहा. मी काय चुकले, ते मला सांगा.

गौतमी पाटील म्हणाली, माझे कार्यक्रम पाहायला येणाऱ्यांना एकच विनंती आहे की वाद घालू नका. कोणाला मारहाण करु नका. आयोजकांच्या वेळेनुसार मी कार्यक्रम सुरु करते. पोलिस खूप सहकार्य करतात. 10 नंतर मला कार्यक्रम घेण्यास परवानगी नाही. पोलिसांच्या परवानगीच्या पुढे मी जाऊ शकत नाही. अजून माझे लग्न ठरलेले नाही, तशा बातम्या आलेल्या माझ्या वाचनात आल्या. मात्र अजून तरी माझ्या डोक्यात लग्नाचा विचार नाही. जेव्हा मी लग्न करणार असेल तेव्हा मी कळवेल.

Leave A Reply

Your email address will not be published.