कोल्हापूर : जनता दाखवून देईल. सत्ता बदलत असते. हे कायमचे सत्तेत बसायला आलेले नाहीत. उद्याच्या विधानसभा निवडणुकीत जनता दाखवून देईल. कर्नाटकात कसे दाखवले, असे म्हणत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच सुनावले. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
अजित पवार कोल्हापूरमधून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, लोकांमध्ये जातीय सलोखा राहावा. सुरक्षिततेची भावना असावी. मी अर्थमंत्री म्हणून अनेक वर्षे काम केले, जयंत पाटील, सुनिल तटकरे यांनी देखील अर्थमंत्री म्हणून काम पाहिले आहे. मात्र आता राज्यात आर्थिक शिस्त राहिलेली नाही.
अजित पवार पुढे म्हणाले, मागे काय तर जुन्या हजारच्या नोटा बंद केल्या आता काय तर 2 हजाराच्या नोटा बंद केल्या. काय चाललय, लोकांना वाटत मोठ्या लोकांकडे असतील नोटा. पूर्वीच्या काळी पैसे जपुन ठेवायच्या. महिलांकडे पैसे ठेवलेले असतात. जा आणि सप्टेंबरच्या आधी त्या नोटा बदलून घ्या.
अजित पवार यावेळी म्हणाले, आम्ही इंदिराजींचा काळ पाहिला, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंह यांचा काळ पाहिला. अनेक निर्णय राज्यकर्ते म्हणून घ्यावे लागतात. मात्र हे सारखे सारखे निर्णय का घेतले जात आहेत. नकली नोटा, बनावट चलन अशा अनेक समस्या उद्भवतात. मात्र वारंवार असे निर्णय का घेतले जात आहेत ते स्पष्ट करावे. देशाच्या भल्याकरिता जर काही निर्णय घेतले जात असतील तर त्याला विरोध करण्य़ाचे काही कारण नाही.
अजित पवार पुढे म्हणाले, आमच्या कारकिर्दित विकास व्हावा, असेच आम्हाला वाटेत. राज्यावर 1 लाख कोटीची बिले देणे बाकी आहेत. राज्यात भ्रष्टाचार वाढलाय. राज्यकर्त्यांना 10-11 महिने झाले आहेत. जूनमध्ये 12 महिने होतील. आर्थिक शिस्त कुठे गेली. वर्षभरात गद्दार, 50 खोके शब्द जनतेला पटलेला आहे. तुम्ही काय काय केले हे जनतेला माहित आहे.