मुंबई : गेल्या महिन्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली आहे. बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल उद्या 2 जून शुक्रवारी जाहीर होणार आहे. दहावीचा निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. उद्या 1 वाजता निकाल बोर्डाच्या बेवसाईडवर जाहीर होईल.
राज्यातून एकूण 15.77 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून 533 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये 84 हजार 416 मुले असून 73 हजार 62 मुली आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल 2023 मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. दहावीच्या मार्च – एप्रिल 2023 परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.