दिल्ली हादरले : दोन सख्या बहिणींची गोळ्या घालून हत्या

0

दिल्ली : दिल्लीतील आरके पुरममध्ये रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी दोन बहिणींची गोळ्या झाडून हत्या केली. येथील आंबेडकर वस्तीमध्ये ही घटना घडली. पिंकी (३० वर्षे) आणि ज्योती (२९ वर्षे) अशी मृत महिलांची नावे आहे.

पहाटे 4.40 च्या सुमारास हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोर पैशाच्या व्यवहारावरून महिलेच्या भावाची हत्या करण्यासाठी आले होते. मात्र घराबाहेर दोन्ही बहिणींवर गोळ्या झाडून त्यांनी पळ काढला.

दक्षिण पश्चिम दिल्लीचे डीसीपी मनोज सी यांनी सांगितले की, दोन्ही बहिणींना गोळी लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.