मुंबई : ज्या व्यक्तीच्या डोक्यात आत्महत्येचा विचार येत असेल, तर ती व्यक्ती मानसिक स्वास्थ बिघडलेली. अशा व्यक्तीच्या हातात राज्य देणे कितपत योग्य, ती व्यक्ती राज्य कसे चालवणार असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
संजय राऊत यांनी दीपक केसरकरांच्या विधानावरून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, एका राज्याचा प्रमुख ज्याच्या हातात संपूर्ण राज्याची धूरा आहे. त्या व्यक्तीबद्दलची अशी गोपनिय माहिती केसरकरांनी इतक्या दिवस का लपवून ठेवली? खरं तर गोपनिय माहिती लपवून ठेवल्यामुळे त्यांच्यावर सर्वात आधी चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली.
केसीआर राज्यात प्रवेश करत आहे. यावर संजय राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले की, केसीआर यांनी आधी आपली भूमीका स्पष्ट करावी. त्यांना नेमकं काय करायचे आहे. या देशातील तानाशाही सरकारला मदत करायची की, त्यांच्याविरोधात लढा द्यायचा आहे. आधी त्यांनी त्यांची भूमीका स्पष्ट केली पाहिजे, असे मत राऊतांनी व्यक्त केले.