मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मंत्रिपदाची स्वप्ने पडणाऱ्या गद्दारांना 1 वर्षानंतर काय मिळाले असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने हिंदुत्व सोडलं असं म्हटलं गेलं. मग आता भाजपने काय केले आहे, तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना असा सवालही त्यांनी विचारला.
मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??
एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “१४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही!
नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला??
आणि सर्वात महत्वाचं… आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं.
मग आज भाजपाने काय केलं??
तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना!