मंत्रीपदावरून शिंदे गटाच्या दोन अस्वस्थ आमदारांमध्ये झटापट ?

0

मुंबई : गेल्या वर्षभरापासून शिंदे गटाचे नेते मंत्रिपदाची माळ कधी गळ्यात पडते, याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, सत्तेत सहभागीहोऊन थेट 9 मंत्रिपदे मिळवणाऱ्या अजित पवारांमुळे शिंदे गटाच्या स्वप्नांना सुरुंग लागल्याचे दिसत आहे. आता जेमतेम तीनचारचमंत्रिपदे वाट्याला येणार असल्याने शिंदे गटाच्या अस्वस्थतेचा आता स्फोट होताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून मुंबईत शिंदे गटाच्यादोन नेत्यांमध्ये सुरुवातीला बाचाबाची नंतर चांगलीच झटापट झाल्याची माहिती मिळत आहे.

सोमवारी अजित पवार गटाचा शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सायंकाळी शिंदे गटाच्या या दोन आमदारांमध्येबाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. याचवेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर दौऱ्यावर होते. मात्र, आमदारांमधील भांडणाचे वृत्त समजताच आपला दौरा अर्धवट सोडून आमदारांमधील भांडण सोडवण्यसाठी ते तातडीने मुंबईत दाखलझाले. दरम्यान, नेमक्या कोणत्या दोन नेत्यांमध्ये भांडण झाले, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, यातील एक नेता हा छत्रपतीसंभाजीनगरमधील असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदारांचे भांडण होताच मुख्यमंत्री शिंदे आपला नागपूर दौरा सोडून तातडीने मुंबईत दाखल झाले. त्यांनीदोन्ही नेत्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर दिवसभरमुख्यमंत्र्यांकडून नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अजितदादांनी मंत्रिपदाची भाकरीच हिरावून नेल्याची भावनाकाही आमदारांनी बोलून दाखवली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून मंत्रिपदाची संख्या वाढवू, असे आश्वासनमुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या आमदारांना दिल्याचे समजते.

गेल्या वर्षभरापासून शिंदे गटाचे नेते हे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते. पूर्वी सत्तेत केवळ शिंदे गट भाजप हे दोनच वाटेकरी असल्यानेसमसमान मंत्रिपद मिळतील अशी आशा शिंदे गटाला होती. त्यातून शिंदे गटाच्या वाट्याला हक्काची 12-13 मंत्रिपदे मिळतील, अशीआशा शिंदे गटाला होती. त्यामुळे अनेक नेत्यांनीही आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. मात्र, आता अजितदादांच्या एन्ट्रीमुळेशिंदे गटाला जेमतेम 3-4 मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्येच आपापसात चूरस वाढली आहे. याचमुद्द्यावरून दोन आमदारांमध्ये मंगळवारी सांयकाळी झटापट झाली. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित झालेल्याबैठकीतहीज्यांनी आतापर्यंत मंत्रिपदे भोगली, त्यांना हटवा आम्हाला संधी द्या‘, अशी आक्रमक मागणी काही आमदारांनी केली. अखेर शिंदेंनी मंत्रिपदाची संख्या वाढवू, असे म्हणत आमदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शिंदे गटात अस्वस्थता असल्याच्या वृत्ताचा प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी इन्कार केला. आमदार नाराज असल्याची अफवापसरविण्यात येत असली तरी सर्व व्यवस्थित सुरू आहे. राष्ट्रवादीच्या सहभागामुळे युती भक्कम झाली आहे, असा दावा म्हस्के यांनीकेला. मात्र, विविध माध्यमांतून मिळत असलेल्या माहितीनुसार अजितदादांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरलीअसून कधीही तिचा स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.