मुंबई : उद्धव ठाकरेंची नागपूरचा कलंक ही टीका जिव्हारी लागल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मंगळवारी ठाकरेंवर अत्यंत तिखट शब्दांत पलटवार केला. माझे माजी मित्र उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती चांगली नाही. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. त्यांची स्थिती आपण समजून घेतली पाहिजे, असे ते म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आमचे आजचे विरोधक व माजी मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर सध्याचा राजकारणाच फारच विपरित परिणाम झाला आहे. कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल की काय? अशी स्थिती आहे. या मानसिक स्थितीतून ते बोलत असतील, तर त्याच्यावर फार काही बोलणे योग्य ठरणार नाही. त्यांची स्थिती सर्वांनी समजून घेतली पाहिजे.
माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख कलंकीचा काविळ म्हणून केला होता.