पिंपरी : पिंपरी–चिंचवड, देहूरोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अॅड क्षितीज टेक्सास गायकवाड यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
भाजपच्या भिवंडी येथील प्रशिक्षण शिबीरात गायकवाड यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महासचीव व महाराष्ट्रचे प्रभारी सी टी रवी, मुंबई अध्यक्ष आशिश शेलार आणि आमदार श्रिकांत भारतीय उपस्थित होते.
वकील, समाजसेवक आणि देहूरोड धम्मभूमी ट्रस्टी असणारे क्षितिज गायकवाड यांचे देहूरोड आणि पिंपरी चिंचवड परिसरात चांगलेकार्य आहे.