नवी दिल्ली ः बाॅलिवुडमधली प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर जास्त सक्रीय असतात. ते बऱ्याच वेळेला घडणाऱ्या घटनांवर आपले मत मांडत असतात. त्यांनी नुकतीच एक पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुपम खेर टक्कल पडलेल्या माणसांना सल्ला देताना दिसत आहेत.
इनस्टाग्रामवर चाहत्यांना सल्ला देताना खेर यांनी लिहिलं आहे की, “जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती हा टक्कल पडलेला असेल तर, या टक्कलवर कोणताही इलाज नाही”, या संदर्भात अनुपम खेर यांनी श्रीमंत व्यक्ती असणारे जेफ बेजोस यांचा मिम शेअर केला आहे.
पोस्टमध्ये पुढे ते म्हणतात की, ”टक्कलवर काही इलाज नसेल तर, कसे वाढविण्यासाठी आपले पैसे खर्च करून नका. आणि सल्ला जगातील सर्व टक्कल पडलेल्या लोकांसाठी आहे”, अनुमप खेर यांच्या पोस्ट चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिलेल्या आहे आणि लाईक्सदेखील मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या आहेत.