प्रवीण तरडे हाताळणार ‘प्रेमकथे’चा विषय 

'कोल्हापूर टू बुलडाणा व्हाया इस्त्राईल', असे आहे आगमी चित्रपटाचे नाव 

0

मुंबई : मुळशी पॅटर्न, देऊळ बंद आणि आगामी चित्रपट सरसेनापती हंबीरराव, या तीन चित्रपटांतून मराठी प्रेक्षकांवर आपली छाप सोडणारे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांंनी आणखी एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. यामध्ये कधीही न हाताळलेला विषय प्रक्षेकांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

‘कोल्हापूर टू बुलडाणा व्हाया इस्त्राईल’, असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. त्यातून एक सुंदर प्रेमकथा प्रेक्षकांसमोर ठेवणार आहेत. प्रवीण तरडे यांच्या घोषणेनंतर मराठी चित्रपटसृष्टीत चर्चा रंगलेली आहे. प्रेक्षकांची उत्सुकताही ताणली गेली आहे.

प्रवीण तरडे म्हणतात की, ”माझ्या चित्रपटांतून नेहमी शेतकरी किंवा सामाजिक विषय मांडले जातात. मात्र, आगामी चित्रपटामंध्ये प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. इस्त्राईलमध्ये शेतासाठी अनुकूल परिस्थिती नसतानाही तिथे शेतीचा विकास झालेला आहे. माझ्या कथेतील पात्रदेखील या विषयाचा अभ्यास करताना दिसणार आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.