ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लसीवर प्रश्नचिन्ह!

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचे महत्त्वाचे वक्तव्य 

0

जिनिव्हा ः करोना प्रतिबंधक लसीसाठी संपूर्ण जगात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशात ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस आघाडीवर होती. मात्र, आता त्यावर शंका निर्माण झाली आहे. अमेरिकेतील तज्ज्ञांनी त्या लसीवर चिंता व्यक्त केली आहे. परिणामी, जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील त्यावर महत्वाचे भाष्य केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे केट ओ ब्रायन म्हणाले की, ”वृत्तपत्र निवेदनात अगदी संक्षिप्त माहिती दिली जाते. ही लस रोगप्रतिकारशक्ती कशी निर्माण करते, याबाबतची सविस्तर माहिती असावी लागते. या निवेदनात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.”

”ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या चाचणीचे आकडे निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी फारच कमी आहेत. या लसीचा आणखी प्रभाव जाणून घेण्यासाठी आणखी चाचणीची गरज आहे”, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे शास्त्रज्ञ डाॅ. सौम्या स्वामीनाथन यांनी मांडले आहे. असा शंका उपस्थित होऊ लागल्यावर ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरिओट म्हणाले की,”लसीची आणखी अतिरिक्त चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी करण्यासाठी स्वयंसेवकांना आणखी एक लोअर डोस दिला जाऊ शकतो.”

Leave A Reply

Your email address will not be published.