डॉ. अमोल पवार यांचे प्रस्थापितांना तगडे आव्हान

बॉण्ड पेपरवर लिहून दिला वचननामा

0

पुणे :  डॉ. अमोल पवार पुणे पदवीधर मतदार संघ  निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या वतीने निवडणूक लढवीत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान पुणे मतदारसंघातील पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये त्यांनी केलेल्या ‘पदवीधर संवाद यात्रेस’ विविध संस्था,  संघटना आणि मान्यवर पदवीधर मंडळींनी बिनशर्त आणि जोरदार  पाठिंबा दर्शविला आहे.  डॉ. अमोल पवार यांनी आपल्या व्हिजनचा वचननामा बॉण्ड पेपरवर लिहून देऊन पदवीधर मतदारांशी बांधिलकी व्यक्त केली आहे.

पदवीधरांचा प्रतिनिधी साखर कारखानदार नको तर स्वच्छ चारित्र्याचा कार्यकर्ता डॉक्टर हवा”, असे मत आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी मांडले.  आप आमदारकीच्या नात्याने पुणे पदवीधर मतदारसंघात कार्यक्षम, सुशिक्षित व नवा चेहरा लाभणार असल्याने परिसरातील युवक वर्गात चैतन्याचे वातावरण आहे. अनेक मान्यवरांनी पाठींबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील निर्भीड पत्रकार मा निखिल वागळे यांनी आपला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करून,”लोकशाहीच्या संवर्धनासाठी डॉ. अमोल पवार यांना निवडून देणे आवश्यक आहे. ते कृतिशील व संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते असून अशी व्यक्ती विधान परिषदेवर जाणे आवश्यक आहे”, असे  असे मत व्यक्त केले आहे.

“संविधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या डॉ. अमोल पवार यांना माझा पाठिंबा आहे व सर्व पदवीधरांनी त्यांना मत द्यावे.”असे जाहीर आव्हान संविधान व मानवाधिकार विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांनी केले. सुप्रसिध्द अभिनेते संदीप मेहता यांनी आपला व्हिडीओ देऊन ‘वोट फॉर वर्क’ चा नारा दिला. तसेच माजी सनदी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी “डॉ.अमोल पवार हे स्वच्छ चारित्र्याचे व्यक्तिमत्व असल्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे.” असे विधान केले. जलनायक संपतराव पवार यांनी सुध्दा डॉ. अमोल पवार यांच्यासारख्या उमद्या व प्रामाणिक नेतृत्वाला निवडून देण्याचा आवाहन केले.

डॉ. अमोल पवार यांना तत्त्वज्ञान परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय डॉ. ज. रा. दाभोळे सर यांनी पाठिंबारुपी आशीर्वाद दिले. डॉ. कल्पना चावला सायन्स सेंटर कराडच्या सर्व पदाधिकारी आणि संयोजक माननीय डॉ. संजय पुजारी यांनी “डॉ.अमोल पवार हे  विज्ञानवादी विचारांचे  कार्यकर्ते असल्यामुळे मी  त्यांना पाठिंबा देत आहे.”असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.