‘बेलबाॅटम’च्या दिग्दर्शकावर शारीरिक शोषणाचा गुन्हा

अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर होतोय ट्रोल 

0

मुंबई ः ‘बेलबाॅटम’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेते अक्षय कुमार स्काॅटलॅण्डमध्ये गेले होते. मात्र, चित्रीकरणादरम्यान, मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण, या चित्रपटाचे कास्टिंग दिग्दर्शकावर आरोप करण्यात आला आहे त्याने आणि त्याच्या मित्राने एकत्रितपणे एका अभिनेत्रीचे शारिरीक शोषण केलेले आहे. या अभिनेत्रीने धाडसाने पोलीस ठाण्यात पोहोचली आणि त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे.

आरोपीचे नाव आयुष तिवारी आहे आणि त्याच्या मित्राचे नाव राकेश शर्मा आहे. या दोघांनी वेगवेगळ्या वेळांमध्ये अभिनेत्रीवर अत्याचार करत होते. स्काॅटलॅण्डवरून अक्षय भारतात येताच सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. ही घटना त्यांच्या या आगामी चित्रपटाचे मोठे नुकसान करून शकते.

या अभिनेत्रीने अनेक वेबसिरीजमधून काम केलेले आहे. पोलिसांच्या मतानुसार पीडितेने सांगितले आहे की, आरोपीने लग्नाचे आमीष दाखवून वारंवार शारीरिक शोषण केलेले आहे. जेव्हा लग्नासाठी पीडितेने लग्नासाठी आग्रह केले तेव्हा आरोपीने रेकाॅर्ड केलेले व्हिडीओ आणि फोटो नेटवर टाकण्याची धमकी दिली होती.”

Leave A Reply

Your email address will not be published.