पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी आज मतदान

0

पुणे : राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी व भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच समोरासमोर आल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रणनीतीमुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची सरशी होणार असल्याचे सांगण्यात येते.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे संग्राम देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, मनसेच्या रुपाली पाटील आणि जनता दल सेक्यूलरचे शरद पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. महत्वाची बाब म्हणजे संग्राम देशमुख, अरुण लाड आणि शरद पाटील हे तीनही उमेदवार सांगलीचे आहेत. त्यामुळे सांगलीतील मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होईल. अशा स्थितीत पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य पुण्यावर अवलंबून असणार आहे. तर कोल्हापूर, सोलापूर आणि सातार्‍यातील मतदारांचा कौलही निर्णायक ठरु शकतो.

पुणे शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार आणि काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्यात लढत होत आहे. दत्तात्रय सावंत आणि जितेंद्र पवार हे सोलापूरचे आहेत, तर आसगावकर कोल्हापूरचे. दरम्यान, जो उमेदवार पुण्यातून सर्वाधिक मतं घेणार तो उमेदवार विजयी ठरण्याची शक्यता अधिक आहे

Leave A Reply

Your email address will not be published.