‘कोरोना’च्या भितीमुळे जेलमध्ये धुमश्चक्री

आठ कैद्यांचा झाल मृत्यू : ५० जण जखमी

0

कोलंबो : श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोच्या जेलमध्ये कैदी आणि तुरुंग अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या झटापटीत ८ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ५० जण जखमी झाले आहेत.

जेलमधील कैदी दरवाजा उघडून पळण्याच्या बेतात होते. यावेळी पोलिसी बळाचा वापर केला. कोरोना व्हायरसमुळे तेथील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवल्याने विरोध होत आहे. अनेक तुरुंगांत कैद्यांनी काही आठवड्यांत याविरोधात आंदोलने केली आहेत. या साऱ्या विरोधात कोलंबोपासून जवळच असलेल्या महारा जेलच्या कैद्यांमध्ये असंतोषाचे वातावरण चिघळले. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अधिकाऱ्यांनी बळाचा वापर केला. यामध्ये ८ कैद्यांचा मृत्यू झाला.

पोलीस प्रवक्ते अजित रोहाना यांनी सांगितले की, कोलंबोपासून १५ किमी लांब महारा जेल आहे. त्यामध्ये कैद्यांनी दंगा घातला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांना कठोर पाऊले उचलावी लागली. या घटनेत दोन जेलरसह ५० जण जखमी झाले आहेत. जखमींना रागामा ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे महारा जेलमध्ये १७५ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे कैद्यांनी दंगा घालत किचन आणि रेकॉर्ड रुमला आगा लावली. जेलमध्ये कोरोनाबाधित मोठ्या संख्येने सापडल्याने ते दुसऱ्या जेलमध्ये हलविण्याची मागणी करत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.