भाजपच्या खासदारांचा कोरोनामुळे मृत्यू; तर आणखी एका खासदाराला लागण

0
नवी दिल्ली : गुजरातचे भाजपचे राज्यसभेचे खासदार अभय भारद्वाज यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. तर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांकडून हि माहिती देण्यात आली आहे.

भाजप खासदार भारद्वाज यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांची तब्येत अधिक खालावली होती. अखेर काल चेन्नई येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अभय भारद्वाज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. 31 ऑगस्ट रोजी खासदार अभय भारद्वाज यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. राजकोटच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र तब्येत अधिक खालावल्याने उपचारासाठी त्यांना चेन्नईला दाखल करण्यात आले. तसेच ३० नोव्हेंबरला भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला होता. याआधी सुद्धा कोरोनामुळे अनेक मोठ्या नेत्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

काही दिवसांपूर्वी सनी देओल यांच्यावर खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते कुल्लूमधील आपल्या फार्महाऊसवर राहायला गेले होते. सध्या सनी देओल यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.