जळगाव ः ”पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. पारंपरिक मतदरासंघही भाजपाने गमावले आहेत. हे भाजपाच्या नेतृत्वाचे अपयश आहे. भापजाच्या अंहपणामुळेच ही वेळ आली आहे”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे भाजपावर टिका केली.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, ”देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर मतदारसंघाची जागा गेली. चंद्रकांत पाटील यांची पुणे मतदारसंघातील जागा गेली. पक्षातून कुणी बाहेर पडले तर, पक्षाला काय फरक फडतो, हे आता चंद्रकांत पाटील यांनी कळेल. ते म्हणाले होते की हिमालयात निघून जाईन. आता मी तेच बघतोय की ते हिमालयात निघून जातात का?”, असाही टोला खडसेंनी दिला.
निवडणुकीत सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीला विजय प्राप्त झाला आहे. फक्त एका ठिकाणी भाजपाला यश मिळाले. मात्र तेही महाविकास आघाडीची मते फुटली म्हणून आम्हाला विजय मिळाला आहे, हे खुद्द भाजपानेच मान्य केले आहे. याचा अर्थ सहा जागांवर भाजपाची पिछेहाट झाली आहे, हे स्पष्ट आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली.