कोरोनाची लस आली तरी सोशल डिस्टन्सिंग गरजेचे

0
जिनिव्हा : कोरोनावरची लस देण्यास सुरुवात केली तरी कोरोना रुग्णाच्या वाढणाऱ्या केसेस थांबण्याची शक्याता अद्याप नाही. लोकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटोकोर पालन करावे लागणार आहे. अन्यथा केसेस वाढण्याची शक्यता अधिक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्ती तज्ज्ञ माईक रायन यांनी एका सोशल मीडिया सेशनमध्ये ‘कोरोनाची पुन्हा एकदा वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी निदान ३ ते ६ महिने तरी अजून आपल्याकडे पुरेसे लसीकरण होऊ शकत नाही.’ असे वक्तव्य केले. त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी लोकांना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, ब्रिटनने अमेरिकन कंपनी फायझरच्या कोरोनावरील लसीला परवानगी दिली आहे. त्यामुळे या लसीच्या वितरणाचा ब्रिटनमधला मार्ग मोकळा झाला आहे. सध्या अनेक लसींच्या चाचण्या या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.