नवी दिल्ली : २०२१ हे वर्ष ग्रहणांच्या दृष्टीने सुद्धा खास असणार आहे. ज्योतिष शास्त्रातील जाणकारांचे म्हणणे आहे की, पुढील वर्षी दोन चंद्र ग्रहण आणि दोन सूर्य ग्रहण लागणार आहेत. ही चारही ग्रहण केव्हा लागतील आणि कोणत्या देशांवर यांचा सर्वात जास्त परिणाम होईल ते जाणून घेवूयात.
२०२१ चे पहिले सूर्य ग्रहण : पहिले सूर्य ग्रहण वर्षाच्या मध्यावर म्हणजे १० जून २०२१ ला लागेल. हे ग्रहण उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग, यूरोप आणि आशियामध्ये आंशिक, तर उत्तर कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियामध्ये पूर्ण रूपात दिसेल.
भारतात हे ग्रहण आंशिक रूपात दिसेल…
२०२१ चे दूसरे सूर्य ग्रहण : २०२१चे दूसरे सूर्य ग्रहण ४ डिसेंबर२०२१ ला लागेल. या ग्रहणाचा परिणाम अंटार्कटिका, दक्षिण अफ्रीका, अटलांटिकचा दक्षिण भाग, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत होईल. मात्र, भारतात या सूर्य ग्रहणाची दृश्यता शून्य असेल, यासाठी भारतात याचा सूतक काळ प्रभावी असणार नाही.
२०२१चे पहिले चंद्र ग्रहण : २०२१चे पहिले चंद्र ग्रहण बुधवारी २६ मे २०२१ ला लागेल. हे ग्रहण दुपारी सुमारे २ वाजून १७ मिनिटांपासून सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांपर्यंत लागेल. हे एक पूर्ण चंद्र ग्रहण असेल, जे पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर आणि अमेरिकेत पूर्ण चंद्र ग्रहणाप्रमाणे दिसेल. भारतात हे केवळ एक उपछाया ग्रहणाप्रमाणे दिसेल.
२०२१चे दुसरे चंद्र ग्रहण : २०२१ चे दुसरे आणि शेवटचे चंद्र ग्रहण शुक्रवार, १९ नोव्हेंबरला लागेल. ग्रहण दुपारी सुमारे साडे अकरा वाजल्यापासून सांयकाळी ५ वाजून ३३ मिनिटांपर्यंत राहील हे एक आंशिक चंद्र ग्रहण असेल, ज्याची दृश्यता भारत, अमेरिका, उत्तर यूरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रात असेल.
२०२० चे शेवटचे सूर्य ग्रहण : या वर्षीचे शेवटचे सूर्य ग्रहण १४ डिसेंबरला लागणार आहे. हे वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण आहे. हे ग्रहण खंडग्रास आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सायंकाळी ७.०३ पासून १५ डिसेंबरला मध्यरात्री म्हणजे १२.३३ मिनिटापर्यंत राहील. सूर्य ग्रहणाचा कालावधी ५ तासांचा राहिल.