पिंपरी : परिसरात सुरु असलेल्या अवैद्य धंद्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारुन १ लाख ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ८ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.नीराधार नगर, झोपडपट्टी एमआयडीसी कॉटर्स लगत, पिंपरी पुणे येथे अंदर-बाहर जुगार अड्डा सुरु होता. चालक सुनिल राजेंद्र मोरे (३८, रा.निराधार नगर , पिंपरी पुणे) व त्याचे इतर ०७ साथिदार यांचे विरुद्ध पिपरी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभाग पथक पिंपरी पोलीस ठाणेचे हद्दीत पेट्रोलिंग करित असताना त्यांना आपले गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अंदर-बाहर जुगाराच्या अड्यावर जुगाराच्या छापा टाकला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे आर.आर.पाटील, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे , यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक डोंगरे , सपोफौ विजय काबंळे , पोहवा सुनिल शिरसाठ , पोना भगवंता मुठे , पोना नितीन लोंढे , पोना अनिल महाजन , मपोना वैष्णवी गावडे , पोना अमोल शिंदे , पोशि गणेश करोटे पोशि मारूती करचुंडे , पोशि योगेश तिडके यांनी केली आहे .