जनतेचं लक्ष हटविणासाठी अशा बातम्या पेरल्या 

यूपीएचे अध्यक्ष शरद पवार होणार असल्याच्या चर्चेला फूलस्टाॅप 

0

मुंबई ः राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होतील, अशी चर्चा आज सकारपासूनच राजकारणाच्या वर्तुळात होती. त्यावर राष्ट्रवादीने उत्तर देत चर्चेला फूलस्टाॅप दिला आहे. असं सांगण्यात आलं आहे की, ”शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होण्याबाबत कुठलीही चर्चा झालेली नसल्याचं राष्ट्रवादीने सांगितले आहे.

राज्यात जसं भाजपाला बाजुला सारून शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत सत्ता स्थापन केली, तो प्रयोग करत केंद्रातही भापला बाजुला सारण्यासाठी आणि सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष केले जाणार आहे, अशी चर्चा माध्यमांमधून होत होती. पण, त्या चर्चा निरर्थक आहेत, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपसे यांनी म्हटलं आहे की, ”यूपीएचे अध्यक्ष शरद पवार होतील, याबाबतीत कोणतीही चर्चा मित्रपक्षांमध्ये झालेली नाही. अशा बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. शेतकरी आंदोलनावरून जनतेचं लक्ष वेधण्यासाठी हेतूपुरस्पर अशा बातम्या पेरल्या जात आहेत,” असं तपसे यांनी स्पष्ट केलेलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.