पुणे : अश्लील फोटो पती व सहकारी पोलिसांना सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पोलीस महिलेवर तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केले. याबाबत तरुणावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज असगर चौधरी (२१, रा. ओटास्कीम, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार पिंपरी पोलीस लाईन, खडकी बाजार पुणे, लव्ह बर्ड लॉज, रॉयल इन लॉज निगडी, श्रीकृष्ण कॉलनी थेरगाव येथे घडला. दरम्यान, आरोपीने त्याच्या मोबाईल फोनमध्ये फिर्यादी पोलीस महिला आणि त्याचे अश्लील फोटो काढले. ते फोटो फिर्यादी यांच्या पतीला आणि फिर्यादी यांच्या सहकारी पोलिसांना पाठवून व्हायरल करण्याची आरोपीने धमकी दिली. त्यातून त्याने फिर्यादी यांच्यासोबत वारंवार लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे