जगात अनेक ठिकाणी गुगल, युट्यूब आणि जीमेल डाऊन

0

नवी दिल्ली ः जगप्रसिद्ध गुगल सर्च इंजिन, जीमेल आणि युट्यूब जगभरात अनेक ठिकाणी डाऊन झालेले आहे. अनेक युजर्सना गुगलवर आणि युट्यूबवर इरर येत आहे. या उद्भवलेल्या परिस्थितीत गुगलने खेद व्यक्त केला आहे. लवकरच आम्ही पूर्ववत सेवा देऊ, असा संदेश तिन्ही ठिकाणी येत आहे.

गुगल सर्च इंजिन, जीमेल आणि युट्यूब नेमके कशामुळे डाऊन झाले आहे, हे समजू शकले नाही. जगाभरातील अनेक या अडचणींना युजर्सना तोडं द्यावं लागत आहे. युट्यूबर सर्च केल्यानंतर समथिंगे वेंट राॅंग असा संदेश येत आहे.

असे असले तरी, जगातील अनेक ठिकाणी  गुगल सर्च इंजिन, जीमेल आणि युट्यूब व्यवस्थित सुरू आहे. तर, काही इरर येत आहे. युट्यूब डाऊन या ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे गुगल डाऊन आणि जीमेल डाऊन हा ट्रेंडही सुरु झाला आहे. त्यावर काही मिम्सदेखील व्हायरल होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.