कराची : लाहोर शहरातील बलात्काराच्या घटनेनंतर देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी पाकिस्तानमध्ये नवा कायदा मंजूर करण्यात आला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी आढळलेल्या पुरुषाला रसायनांचा वापर करून नपुंसक बनवण्यात येण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी या कायद्यावर स्वाक्षरी केली.
या कायद्यामध्ये अशीही तरतूद आहे की गुन्ह्यात सामील असलेल्या लोकांचे नॅशनल रजिस्टर तयार करण्यात येणार आहे. या अंतर्गत पीडितेची ओळख गुप्त ठेवण्याची तरतूद असेल. काही गुन्हेगारांना औषधी देऊन नंपुसक बनवण्यात येणार असल्याचंही म्हटलं आहे. अशा घटनांची सुनावणी चार महिन्यात पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करण्यात येणार आहे.
या कायद्यास देशातून काहींनी विरोध केला आहे. मात्र महिलांची सुरक्षा आणि वाढती प्रवृत्ती याचा विचार करुन हा कायदा मंजूर करण्यात आलेला आहे.