इस्त्राइल : करोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी करोना लसीकरण करून घेतले. सर्वांत पहिल्यांदा पंतप्रधानांना ही लस टोचण्यात आली आहे आणि नंतर संपूर्ण देशात करोना लसीकरण मोहीन राबविण्यात येणार आहे.
नेत्यानाहू यांना लस टोचण्याचा व्हिडीओ टेलिव्हजनवर लाईव्ह दाखविण्यात आले. जगातील मोजक्यात नेत्यांना करोनाची लस टोचून घेतली आहे. त्यामध्ये बेंजामिन नेत्यानाहू यांचा समावेश झाला आहे.
प्रथम स्थानावर काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना पहिल्यांदा लस टोचण्यास सुरुवात झाली आहे. डाॅक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांना प्राधान्याने लस टोचली जात आहे. देशातील नागरिकांची लसीकरणावरील विश्वास वाढावा आणि त्यांच्या मनातील भिती दूर व्हावी, यासाठी बेंजामिन नेत्यानाहू यांनी प्रथम लश टोचून घेतली.