सातारा : जिल्ह्यात कोरोनाची भिती वाढत आहे. शुक्रवारी (दि. 18) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 81 नागरिक करोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शनिवारी दिली.
जिल्ह्यात काल 1143 चाचण्यांचे अहवाल जाहीर करण्यात आले. त्या तुलनेत बाधितांचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) अवघा 7.08 टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.04 टक्के आहे. त्यामुळे एका बाजूला दिलासा मिळाला असताना, दुसऱ्या बाजूला गेल्या 24 तासांमध्ये करोनाबळींची संख्या वाढली. त्यामुळे चिंता कायम आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात शाहूनगर दोन, शनिवार पेठ, चिमणपुरा पेठ प्रत्येकी एक, इतरत्र चार, विकासनगर दोन, करंजे पेठ, शाहूपुरी, संभाजीनगर, निनाम, खेड प्रत्येकी एक, कराड तालुक्यात कराड शहर एक, पाटण तालुक्यात कोयनानगर एक, फलटण तालुक्यात फलटण शहर, आरडगाव, साखरवाडी प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात कलेढोण सहा, खटाव पाच, मायणी तीन, सातेवाडी दोन, कातरखटाव, राजाचे कुर्ले, वडूज, पाचवड प्रत्येकी एक, माण तालुक्यात मलवडी चार, दहिवडी, म्हसवड प्रत्येकी तीन, धामणी एक, कोरेगाव तालुक्यात कोरेगाव पाच, जळगाव एक, जावळी तालुक्यात कुडाळ चार, वाई तालुक्यात ओझर्डे एक, खंडाळा तालुक्यात खंडाळा सहा, शिरवळ दोन रुग्ण आढळले.