वृत्तसंस्था : अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी कोरोना व्हायरसवरील प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली आहे. लस सुरक्षित असून नवीन वर्षात सर्वांना लस टोचण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जो बायडन यांना फायझरकडून तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीचा पहिला डोस, देण्यात आला आहे. अमेरिकेत फायझरच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर संपूर्ण जगासमोर हे वृत्त आलं.
लसीकरणासाठी उचलली जाणारी एकूण पावलं आणि या प्रक्रियेला आलेला वेग पाहता पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2021 पासून इथं सर्वसामान्य नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.