मुंबई : सहार पोलिसांनी ड्रॅगनफ्लाय नाईट क्लबवर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास धाड टाकून कारवाई केली असता भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनादेखील तिथे उपस्थित होता. या कारवाईत ३४ जणांना अटक केलेली होती, तसेच त्यामध्ये सुरेश रैनीसहीत अनेक सेलेब्रिटींचाही समावेश होता. परंतु, सुरेश रैनाची जामिनावर सुटका करण्यात आली आहेत.
यावर सुरेश रैनाकडून अधिकृत उत्तर आले आहे. रैनाच्या मॅनेजमेंट टीमकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये सांगितलं आहे की, ”सुरेश रैना एका शूटसाठी मुंबईत होता, ज्याची वेळ नंतर पुढे वाढली. सुऱेश रैना रात्रीच्या विमानाने दिल्लीला निघणार असतानाच त्यापूर्वी मित्राने त्याला डिनरसाठी बोलावलं होतं. त्याला स्थानिक वेळा आणि प्रोटोकॉलची माहिती नव्हती. माहिती मिळाल्यानंतर त्याने लगेचच त्याची काळजी घेतली. दुर्दैवी घटनेबद्दल त्याने खेद व्यक्त केला आहे. सुरेश रैना नेहमीच प्रशासनाकडून आखून दिलेल्या नियमांचं पालन करत असून भविष्यातही करत राहील”, असं त्याच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केलेली होती. मुंबई विमानतळावजवळ असणाऱ्या या क्लबमध्ये सुरेश रैना उपस्थित होता. सुरेश रैनासोबत गायक गुरु रंधवा तसंच ह्रतिक रोशनची पत्नी सुझान खानवरही गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ”माजी भारतीय क्रिकेटर आणि इतर काही सेलिब्रेटींसोबत एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोनाशी संबधित नियमांचं पालन केल्याने तसंच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.”