जयंत पाटील यांच्याकडून शिवसैनिकांना दुय्यम वागणूक 

0

सांगली ः जिल्हाचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून शिवसेना कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक मिळत आहे. जिल्ह्यातील स्थानिक शासकीय समित्यांवरील निवडींमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे, अशी तक्रार राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर शिवसैनिकांनी केला.

यासंबंधी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तुमचे गाऱ्हाणे मांडेन, असे आश्वासन शंभूराज देसाईंनी दिले. ग्रामपंचायत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सांगलीत आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते.
देसाई म्हणाले की, राज्यात किमान समान कार्यक्रमानुसार शासकीय समित्यांमध्ये शिवसैनिकांना स्थान मिळाले पाहिजे. मात्र, या निवडीमध्ये सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. यासंबंधी तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या जातील आणि यातून मार्ग काढला जाईल. शिवसैनिकावर अन्याय होणार असे आश्वासन शंभूराज देसाईंनी कार्यकर्त्यांना दिला.
Leave A Reply

Your email address will not be published.