ब्रिटनमध्ये पुन्हा एका करोनाची प्रजात आढळली

0

लंडन ः नुकत्याच आढळलेल्या करोनाच्या प्रजातीपासून ब्रिटन सावरतोय तोपर्यंत दुसऱ्या प्रकारची नव्या करोना प्रजातीची भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांमध्ये ही नवी करोनाची प्रजात आढळून आलेली आहे, अशी माहिती ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅठ हॅनकाॅक यांनी दिली आहे.

मागील दोन आठवड्यांपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांना स्वतःहून विलगीकरणात जावे, अशा सूचना ब्रिटनच्या सरकारने दिल्या आहेत. आतापर्यंत नव्या करोनाची नवी प्रजात २ रुग्णांच्या शरीरात आढळून आलेली आहे.

ब्रिटनबरोबर दक्षिण आफिक्रेतही या नव्या करोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. पुर्वीच्या विषाणुपेक्षा ७० टक्के अधिक वेगाने हा विषाणू पसरतो आहे, असं सांगितलं जात आहे. हा नवा प्रकार अधिक संसर्गजन्य आहे, असं ब्रिटनने सांगितले आहे.

यासंदर्भात हॅनकाॅक म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेच्या प्रभावी जिनोमीक क्षमतेमुळे ब्रिटनमध्ये आणखी एका नव्या प्रजातीचा विषाणू आढळून आला आहे. मागील आठवड्यातून दक्षिण आफ्रिकेतून जाऊन आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये हा करोना आढळून आलेला आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.