ही शेवटची महामारी नाही : टेड्रोस

0

जिनिव्हा ः जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अघानोम घेब्रेयेसस यांनी सांगितले की, करोना विषाणूची महामारी ही अंतिम महामारी आहे, असे नाही. मानवाने प्रगतीच्या नावाखाली निसर्गाने केलेले आक्रमण हे घातक आहे, त्यामुळे आपण निसर्गाचे अपराधी आहोत. आपल्या अशा वागण्याने भविष्यासाठी चांगले काही करू शकत नाही आहोत.

रविवारी आयोजित करण्यात येणाऱ्या महामारीच्या पूर्वीची तयारी यावर त्यांची वरील व्हिडीओ मेसेज दिला. जागतिक आरोग्य संघटेनेच्या प्रमुखांनी सांगितले की, “करोना महामारीकडून धडा घेण्याची गरज आहे. दीर्घ काळापर्यंत भितीच्या आणि उपेक्षेच्या चक्रात मानव फसलेला आहे. आपण एका प्रकोपातून बाहेर पडण्यासाठी पैशांचा वापर करतो आणि त्यातून बाहेर पडलो की सर्व विसरून जातो. भविष्यात पुन्हा परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून काहीच प्रयत्न आपण करत नाही. हा विचार खूप घातक आणि अल्पदृष्टीचा आहे. याला समजून घेणं अवघड गोष्ट आहे”, असे मत प्रमुखांनी मांडले.

जागतिक तयारी आणि निरीक्षण बोर्डाने सप्टेंबर २०१९ मध्ये आरोग्य आणीबाणीला घेऊन जागतिक तयारी या विषयाला घेऊन एक अहवाल करोना संक्रमणाच्या काही महिन्यापूर्वीच प्रकाशित करण्यात आला होता. त्यात असं लिहिलं होतं की, ही बाब खूप दुखद आहे की, आपली पृथ्वी विनाशकारी महामारीला तोंड देण्यास समर्थ नाही.

टेड्रोस यांनी हे देखील सांगितले की, “इतिहास साक्षीला आहे. ही महामारी काही शेवटची महामारी नाही. महामारी मानवी जीवनातील एक सत्य आहे. या महामारीने मनुष्याचे आरोग्य, प्राणी आणि निसर्ग यांच्या नात्यातील दूरावा उघडकीस आणला आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.