५० फूट खोल दरीत खासगी बस कोसळली; लहान मुलाचा मृत्यू

0

रायगड ः कशेडी घाटात खासगी बस ५० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. चिंतामणी नावाची ही खासगी बस असून मुंबईमधून कणकवलीच्या दिशेने जास असताना हा भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये एकूण २७ प्रवाशी होते, त्यातीव २६ जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून त्यामध्ये एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पहाटे ४ वाजता ही घटना घडली आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पुढे दाखल करण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात रायगड हद्दीतील पोलादपूरजवळील भोगाव येथे हा हा अपघात झाला आहे. २६ जणांना बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, दुर्देवाने त्यामध्ये एका ७ वर्षांच्या बालकांचा मृत्यू झालेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.