ब्रिटन नंतर ‘या’ देशात लॉकडाऊनची घोषणा

0

बर्लिन : परदेशात कोरोनाच्या नव्या व्हायरसचा कहर वाढत आहे. त्यामुळे ब्रिटनने लॉक डाऊन केले आहे. त्यानंतर आता जर्मनीमध्येही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे.

या महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊनचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे चान्सलर अँजेला मर्केल यांनी सांगितले.

एकाच दिवशी जर्मनीत १ हजार १२९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी एकाच दिवशी ९६२ जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे जर्मनीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३२ लाख १०७ झाली आहे.

१६ डिसेंबर २०२० पासून शाळा, दुकाने तसेच व्यापारी आस्थापने बंद करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आता या महिन्याच्या अखेरीपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

Germany is extending its nationwide lockdown until the end of the month and is introducing new tougher restrictions in a bid to get control of surging coronavirus infections, Chancellor Angela Merkel has said: Reuters

— ANI (@ANI) January 5, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.