राज्यात पेट्रोल, डिझेलचा भडका…वाचा सविस्तर

0

मुंबई : पेट्रोलचे दर सलग दुसऱ्या दिवशी २५ पैशांनी वाढून ८५.२० रुपये लिटर झाले. हा पेट्रोलच्या दराचा उच्चांक ठरला आहे. दरम्यान, डिझेलपंचाहत्तरी पार करून ७५.३८ रुपये लिटर झाले आहे.

मुंबईत डिझेल ८२ रुपयांच्यावर गेले असून, पेट्रोल ९१.८० रुपये लिटर झाले आहे. कोलकातात डिझेल ७८.९७ रुपये लिटर, तर पेट्रोल ९०.१६ रुपये लिटर झाले.

सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल) या कंपन्यांनी जवळपास महिनाभरानंतर ६ जानेवारी रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांचा दररोज आढावा घेण्यास सुरुवात केली होती.

महाराष्ट्राच्या चार महानगरांतील इंधन दर –
पेट्रोल –
मुंबई –     ९१.७८ ( ०.२४)
नागपूर –     ९१.६५ ( ०.२४)
पुणे –     ९१.४७ ( ०.२४)
औरंगाबाद – ९३.०१ ( ०.२४)

डिझेल
मुंबई –     ८२.११ ( ०.२६)
नागपूर –     ८०.७८ ( ०.२६)
पुणे –     ८०.५८ ( ०.२६)
औरंगाबाद – ८३.३५ ( ०.२७)

Leave A Reply

Your email address will not be published.