राजकारणात येण्याच्या भानगडीत पडू नका : अजित पवार

0

पिंपरी : तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं तिथं जा पण आमच्या (राजकारण) क्षेत्रात येण्याच्या भानगडीत पडू नका. हे राजकारण काही खरं नाही, असा सल्ला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुणे जिल्हा परिषदेने गौरव केला. तेव्हा अजित पवार स्वतः शिक्षकांच्या भूमिकेत पहायला मिळाले. त्याच नात्याने त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक मोलाचे सल्ले दिले.

राजकारणात मी अडकलोय तसं तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिकडं अडकू नका. इथं हालता ही येईना अन् कुठं जाताही येईना. तिथं तुमच्यासह आई-वडील आणि पंचक्रोशीचं नाव कमवा. असा सल्ला अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्याचवेळी पोट सुटलेल्या पुढाऱ्यांना चिमटाही काढला.

पूर्व उच्च माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील 106 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यांना अजित पवारांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी भारताच्या तेजोमय विकासासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत दाखल व्हायचे प्रयत्न नक्की करा. असं शिक्षकांच्या भूमिकेत असलेल्या पवारांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.