मुंबई : दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातील जननेतेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान, पुण्यातील सर्व संवेदनशील ठिकाणावरील बंदोबस्तासाठी असणार्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना सर्तकतेचे आदेश देण्यात आल्याची माहिती पुणे शहर पोलिस दलातील विशेष शाखेचे उपायुक्त मितेश गट्टे यांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये देखील महत्वाच्या ठिकाणांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.