काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री नितीन राऊत यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतलीय. या भेटीमुळे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नाना पटोले यांना नितीन राऊत यांचं खातं दिलं जावू शकतं. आक्रमक आणि काँग्रेसमधील दलित चेहरा असलेले नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्रिपद मिळू शकतं.
महाविकासआघाडी सरकारमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद शिवसेना स्वत:कडे ठेवून काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला ऑफर करण्यात आलं. त्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला ऑफर केल्याची माहिती आहे.