शहरात छाटणीच्या नावाखाली झाडांची कत्तल; कारवाईची मागणी

0

पिंपरी : शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड केली जात आहे. छाटणीच्या नावाखाली झाडांची कत्तल केली जात आहे. याबाबत 50 हून अधिकवेळा तक्रार केली, त्याचे पुरावे देवूनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप करत अवैध वृक्षतोड थांबवावी. वृक्षतोडीला परवानगी देताना नियमांचे पालन करावे. वृक्षतोडीऐवजी पुनर्रोपणावर भर द्यावा अशी मागणी शहरातील विविध पर्यावरणप्रेमींनी केली. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा करावा त्यांनी दिला आहे. नाहीतर येत्या काळात मोठे आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

शहरात अवैधवृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊन कालावधीत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड झाली आहे. होर्डिंग्ज झाडावर उभारले जातात. होर्डिंजसाठी झाडे तोडली जातात . त्याचे पुरावे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला दिली . कारवाईचे आश्वासन दिले जाते . प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नाही.झाटणीच्या नावाखाडी झाडांची कत्तल केली जात आहे.

वृक्षतोडीला परवानगी देताना नियमांचे पालन केले जात नाही. अर्ज , वृक्ष प्राधिकरण समितीच्या अधिका – याने स्थळाची पाहणी करणे, 30 दिवसात अहवाल देणे , हरकती सूचना मागविणे या प्रक्रियेचे पालन केले जात नाही . झाडावर पक्षाचे घरटे असेल तर पक्षी सोडून जात नाही . तोवर झाड तोडू शकत नाहीत , असा नियम आहे . पण , त्याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे . रात्री झाडे तोडू शकत नसतानाही रात्री झाडे तोडली जातात.अवैधपद्धतीने झाड तोडल्यावर दंड , कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे . झाड तोडल्यावर पंचनामा केला जात नाही . तक्रारीवर पालिककेडून कारवाई केली जात नाही.रविंद्र सिन्हा पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा बोलत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.