ऑकलँड : न्यूझीलँडच्या सर्वात मोठ्या शहरात तीन दिवसांचे लॉकडाऊन लावले जात आहे. हे लॉकडाऊन रविवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहे. शहरात नवीन कोरोना व्हायरसच्या केस समोर आल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलँडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी कॅबिनेटच्या महत्वाच्या सदस्यांसोबत मीटिंग घेतल्यानंतर शनिवारी सायंकाळी निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हटले की, ते तोपर्यंत सतर्क राहतील, जोपर्यंत त्यांना शहरात आलेल्या नवीन कोरोना व्हायरसबाबत पूर्ण माहिती मिळत नाही.
ही सुद्धा माहिती घेतली जात आहे की, नवीन कोरोना व्हायरस पहिल्याच्या पेक्षा जास्त संसर्गजन्य आहे का? जेसिंडा अर्डर्न यांनी सांगितले की, अन्य देशांना सुद्धा जास्त प्रतिबंधांच्या आत ठेवले जाईल जेणेकरून ऑकलँड शहराशिवाय अन्य ठिकाणी लॉकडाऊन लावण्याची गरज भासणार नाही.
रविवारी न्यूझीलँडच्या आरोग्य अधिकार्यांनी माहिती दिली की, ऑकलँडमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्य अशा कोरोना व्हायरसने संक्रमित आढळले आहेत ज्याची ओळख पटवता आलेली नाही. यासाठी शहरात नवीन कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यूझीलँडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी आपले सर्व प्लॅन कॅन्सल केले आहेत आणि त्या शहरात कोरोना व्हायरस रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी परत राजधानी वेलिंग्टनमध्ये आल्या आहेत. अन्य देशांच्या तुलनेत न्यूझीलँड कोरोना व्हायरसला मागे टाकण्यात अतिशय यशस्वी ठरला आहे. मात्र, बॉर्डरवर अजूनही परत येणार्या प्रवाशांमध्ये कोरोनाची प्रकरणे आढळत आहेत मात्र अशा लोकांना न्यूझीलँडमध्ये पहिले दोन आठवडे कॉरंटाइनमध्ये घालवावे लागतात.