आयटी क्षेत्रात मोठया प्रमाणावर नोकऱ्या मिळणार

0

नवी दिल्ली : कोरोनामुळे जगात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. यासह वेगवेगळ्या क्षेत्रालाही फटका बसला. आता कोरोनावर लसीकरण सुरु झाल्यानंतर हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येत असून उद्योगधंदेही सुरू झाले आहेत.

कोरोनाच्या संकटानंतरही आयटी सेक्टरने जीडीपीमध्ये जवळपास 8 टक्के इतकं योगदान दिलं आहे. आता NASSCOM च्या सर्वेनुसार अशी माहिती समोर आली आहे की, आयटी सेक्टरमधील 95 टक्के सीईओंना आशा आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत 2021 मध्ये या क्षेत्रात जास्त नोकऱ्या उपलब्ध होतील.

आयटी क्षेत्रातील तब्बल 67 टक्के सीईओंच्या मते आर्थिक वर्ष 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये चांगलं काम होऊ शकतं. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 2.3 टक्के माहिती सेवा क्षेत्रातील उत्पन्नाच्या वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी 190 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात आयटी कंपन्यांची उलाढाल ही 194 बिलियन डॉलर असल्याचा आंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.