कविता सिद्धेश त्रिवेदी (३२, रा. पिसादेवी परिसर) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती सिद्धेश गंगासागर त्रिवेदी हा पसार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कविता व सिद्धेश या दांपत्याला आठ वर्षांचा मुलगा रुद्र व तीन वर्षांची मुलगी ऋचा अशी दोन अपत्ये आहेत. आठ वर्षांचा मुलगा रुद्र हा दुसरीत शिकतो.
धक्कादायक म्हणजे, दिवसभर रुद्रने छोटी बहीण ऋचाचा सांभाळ केला. परंतु, संध्याकाळ झाल्यावर चिमुकली ऋचा धाय मोकलून रडू लागली. त्यालाही न राहवल्याने तोही रडू लागला आणि शेजाऱ्यांना आवाज गेला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
कविताचा खून करून सिद्धेश घराला कुलूप लावून पसार झाला होता. मुले रडायला लागल्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता हा आवाज शेजाऱ्यांच्या कानी आला. त्यांनी जाऊन पाहिले तर बाहेरून कुलूप अन् आतमध्ये मुले रडत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ अन्य शेजाऱ्यांना ही माहिती देऊन कुलूप तोडले. त्यानंतर कविता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.