IPL : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याच्यावर मोठी बोली

0

चेन्नई : आयपीएल 2021 च्या लिलावाला चेन्नई येथे सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याच्यावर जोरदार बोली लागल्याचे पहायला मिळाले. मॅक्सवेलची बेस प्राइज यावेळी दोन कोटी रुपये एवढी होती. मात्र, लिलावात सर्वच संघांनी त्याच्यावर बोली लावल्याचे पहायला मिळाले. अखेर आरसीबीने मॅक्सवेलवर सर्वोत्तम बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले आहे.

मॅक्सवेल याला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी यांच्यामध्ये स्पर्धा लागल्याचे पहायला मिळाले. अखेर आरसीबीने मॅक्सवेलला 14 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या संघात घेतले. चेन्नई आणि आरसीबीने मॅक्सवेलला आपल्या संघात घेण्यासाठी एकवर एक बोली लावली.

दोन्ही संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याचे पहायला मिळाले. मागच्या सिझनमध्ये मॅक्सवेलला चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-20 मालिकेत त्याने धडाकेबाज फलंदाजी केल्याने यावेळी त्याच्यावर सर्वाधिक बोली लागली.

#IPLAuction2021 | Glenn Maxwell is sold to Royal Challengers Bangalore for Rs 14.25 Crores: Indian Premier League

(file photo) pic.twitter.com/YT9RwixgqY

— ANI (@ANI) February 18, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.